एकाचवेळी दोन युद्धं लढावी लागली तर मराठी व्यवसाय बंद पडणार नाहीत तर काय?
मराठी धंदे बंद पडतात...ते उगीच नाही.
काल एका मित्राशी बोलणं झालं. आम्ही दोघांनी साधारण एकाच काळात जॉब सोडून आपापलं स्टार्ट अप सुरू केलं होतं. पार थकून गेल्यासारखा वाटत होता.
स्टार्ट अप इको सिस्टीम मध्ये एक अलिखित नियम आहे - हसरा चेहरा बाळगत फिरण्याचं...!
"माझं स्टार्ट अप आहे, आम्ही एकदम रॉकिंग फेज मध्ये आहोत, आमचे आकडे धमाकेदार घोडदौड करत आहेत..." --- हे सतत भासवत राहवं लागतं. अर्थात, हे बहुतेक वेळा खरंच असतं. पण ते साध्य होत असताना येत असलेला तणाव दिसू देता येत नाही.
हसरा चेहरा सतत मेंटेन ठेवणं मजाक नसते. बिझनेस गोल्स साध्य करत असताना २४ तास मेंदू सतत तणावाखाली असतो...पण तो तणाव दिसू द्यायचा नसतो.
उद्योगात नव्याने मुसंडी मारणाऱ्याने ती तयारी केलेली असतेच. पण - त्रास तेव्हा अनावर होतो - जेव्हा बिझनेस प्रेशर शिवाय इतर कटकटी सुरू होतात.
नोकरी सोडून बिझनेस करायचा निर्णय घेताना हा मित्र घरी व्यवस्थित बोलला होता. पुढे दोन अडीच वर्ष कठीण असतील, मुव्हीज-शॉपिंग-हॉटेलिंग-ट्रॅव्हलिंग --- ही मध्यमवर्गीय हौस बाजूला ठेवावी लागेल, घरात इन्व्हॉल्व्हमेंट कमी असेल...ही सर्व कल्पना त्याने दिली होती. (मला हे माहितीये कारण आम्ही दोघांनी ही पावलं एकमेकांशी चर्चा करत करतच उचलली होती.)
तेव्हा चटकन होकार देणारी फॅमिली आज मात्र सैरभैर झाल्यासारखी वागतीये.
बायकोने तेव्हा दाखवलेला सपोर्ट १२ महिन्यात उडून गेलाय...घरात सारखी किरकिर होतीये...आणि हा रोज बिझनेस टार्गेट अचिव्ह करण्याच्या टेन्शनमध्ये!
त्याच्या प्रोडक्ट ला प्रतिसाद उत्तम आहे. पण अपेक्षित होता तेवढा पैसा उभा रहात नाहीये - त्यामुळे बिझनेस प्लॅनिंग, फ्युचर अप्रोच सर्वकाही बदलावं लागणार आहे.
तो ती लढाई लढायला तयार आहे - मला पक्कं माहितीये - पण ही घरातली लढाई कशी लढेल?!
एकाच वेळी २ फ्रंटवर कसं लढणार?! ज्या सैन्याच्या जोरावर लढायचं होतं, ते सैन्यच कुरबुरी करत असेल तर साम्राज्य कसं उभं रहाणार?
हा माझा मित्र एकदम रॉकस्टार आहे. ह्या अडचणीतून तो पुढे जाईल ह्यात शंकाच नाही. पण अश्या अडचणी अनेकांना येत असणार...त्यात कितीतरी जण अडकून जात असणार ही कल्पना त्रासदायक आहे.
मराठी धंदे बंद पडतात...ते उगीच नाही...!
============================
छायाचित्र स्रोत : opstart.ca

करेक्ट!!
ReplyDeleteHe diwas pan nakki saratil ani sagale parat kautuk karayla lagtil. So sadhya...
ReplyDeleteKuch to log kahenge.. logo ka kam hai kehena .. lekin mere dost tu jamkar rehena..! ase mhanawese watatate..!!!!
👍
ReplyDeleteछान
ReplyDeleteSahi hai... Bt time is healing all the wounds...
ReplyDeleteGood
ReplyDelete